नको वायदा, जमेल तेंव्हा भेटू आपण.
भेटू न शकलो तरी हरकत नाही.
चंद्रमाधविच्या प्रदेशातील आपल्या भेटिंचा मोरपिसारा ठेवलाय मी जपून
दूर गड्या तू खुप योजेने माझ्यापासून, तरी भासतो समीप मजला.
अशाच अमृतभासांसवे कंठीन मी जीवन
कारण आयुष्य तेच आहे नि तसेच राहिल तुझ्या अनुपस्थितीताही.
सून्या घरात बोलू कुणाशी हाच फ़क्त पेच आहे.
तुझ्या भेटीची हमी नसतानाही, मौसमी श्वासांसवे
आपल्या भेटीची हिरवळ ग्रिष्मात्तही मी शोधते आहे…