अनाम दुःखही दुःख्खी होवू लागलेय आता
दुःखच माझ्या जखमांवरचे लेप झालेय आता,
दुःखांसवे कधी न रडले मी,
दुःख मलाच बिलगून रडतंय आता.
एकदा ढगांनिही कट रचला, माझे घर मातीचे,
माझ्याच घरावर पाउस कोसळला
त्याचा हट्ट वीज पाडण्याचा, विध्वन्साचा.
नी माझाही…तिथेच घरटे बांधन्याचा!
कोण जाणे कां म्हणुन लाटा किनारयावर आदळूंन जातात?
खरंच कां त्या किनारयाला सोडून जांत त्याच्याशी विश्वासघात करतात?
की, प्रदिर्घ विरहानंतर पुनःश्च भेटीच्या उत्कटतेने दिलेला शब्द पाळत किनारयाला कडकडून मिठी मारतात??
पहाटेच्या रवीकिरणांनी उजळलेले दवबिंदू
धरतीला मोत्यांचा प्रेम-उपहार भासली
पण ते दवबिंदू, चांदण्यांनी रजनीच्या कुशीत
ढाळलेली प्रेम विरहाची आसवे होती…
ग्रीष्माची धग आता सोसवत नाही
वणवा पेटलाय सारया मनात.
पानगळ सुरु झालीये… पिकली पाने खोडांपासून, फांदंयावरून गळून पडताहेत, हवेबरोबर सैरभैर धावताहेत… ती पानेनव्हेताच, ती विरक्त हृदयाची स्पंदने होत.
The Pianist
6 years ago
'चारओळी' असं गुगलींग करुन नवीन चारोळ्या शोधुन वाचताना तुझा ब्लॉग हाती लागला आणि आज काहीतरी अर्थपुर्ण वाचतोय असं वाटलं. एका दमात सारे पोस्ट वाचुन काढले.
ReplyDeleteचारो़ळ्या वाचताना तर क्षणभर सगळ्याच हालचाली थांबल्या आणि हात आपोआप प्रतिक्रिया देण्यासाठी वळले. सारयाच चारोळ्या एकदम झकास आहे पण त्यांना एक कुठेतरी दु:खाची किनार आहे. दुसरी चारोळी फारच झकास आहे.
"त्याचा हट्ट वीज पाडण्याचा, विध्वंसाचा.
नी माझाही…तिथेच घरटे बांधण्याचा.. "
किती सुंदर..वाह !
अशाच अजुनही चारोळ्या, कविता वाचायला मिळुदेत, जमलंच तर marathiblogs.net इथे तुझा ब्लॉग कनेक्ट कर.
ब्लॉगवरच्या विनंतीमुळे नव्हे तर ब्लॉग मनापासुन आवडला म्हणुन प्रतिक्रिया देण्याचा हा खटाटोप :-)
-अजय
Hi Ajay, Thanks for dropping by..nice to recieve ur feedback.
ReplyDeleteYeah, I am hibernating for quite some time..cudn't write/post nything here since long...but its high time, lemme c what i can dish out..:)